कोयना धरण व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा - विक्रमबाबा पाटणकर

मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - जलसंपदा विभागाचे माजी सचिव वडणेरे यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली वडणेरे समिती स्थापन झाली त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील (आबा), मंत्री जयंत पाटील यांनी अलमट्टीधरणामुळे पुर आला. असे भाकीत केलेले होते. परंतु यावेळी महाराष्ट्र राज्याचे अभियंता व कर्नाटक राज्याचे अभियंता यांच्या अलमट्टी धरण व कोयना धरणाच्या पाणी व्यवस्थापनावर संयुक्तिक रित्या बैठका झाल्या यामध्ये पुरपरस्थितीवर अभ्यास करून तसे परिपत्रक संबंधित विभागांना लागू केले होते. तरीसुध्दा गतवर्षी २०१९ रोजी या परिपत्रकाचे पालन न झाल्ल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व धरण व्यवस्थापनाच्या गच्छाळ कारभारामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात जलप्रलय निर्माण झाला. यामध्ये प्रंचड जिवीत हानी व वित्त हानी झाली. याला संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. अशा स्वरुपाची मागणी गतवर्षी केलेली होती. मात्र शासनाने व राजकीय नेतेमंडळीनी याकडे जानिवपूर्वक दुर्लक्ष करून संबधित आधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण येथे पत्रकार परिषदेत केला.
विक्रमबाबा पाटणकर पुढे म्हणाले, वडणरे समिती, संबंधित मंत्री, अधिकारी यांच्या या सर्व बाबींवर विस्तृत पणे चर्चा होऊन कोणत्या महिन्याच्या कोणत्या तारखेला किती पाणी साठा कोयना जलाशयामधे साठवावा व पर्जन्यवृष्टी वाढली तर किती क्युसेक्स पर सेंकदाने पाणी विसर्ग करावे याबाबत अभ्यास केला होता. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी तशा पध्दतीची परिपत्रके संबधीत विभागास लागू केली होती. अशी परिस्थिती असताना सुध्दा २०१९ रोजी या आदेशाचे पालन न झाल्ल्यामुळे ऐवढ्या मोठ्या जलप्रलयामधे सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात प्रंचड जिवीत हानी व वित्त हानी झाली. याला संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरुन संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशा स्वरुपाची मागणी २०१९ साली केलेली होती. मात्र शासनाने व राजकीय नेतेमंडळीनी याकडे जानिवपूर्वक दुर्लक्ष करून संबधित आधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.
आता नुकतेच वडणेरे समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा विभागाचे माजी मुख्य सचिव यांनी अलमठ्ठीचे धरण २०१९ च्या पुरहानीत कारणीभुत नाही. अशा पध्दतीचे जाहीर विधान केलेले आहे. मग याचा दुसरा आर्थ असा निघतो या सर्व महापुराला सर्वस्वी कोयना धरण व्यवस्थापन जबाबदार आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांची कठोर चौकशी होणे काळाची गरज आहे. आज प्रचंड जिवीत व वित्त हानी झालेली असताना अनेक शेतकरी व्यापारी सामान्य जनता शासकीय मदतीपासून वंचित आसताना कार्यकारी अभियंता योग्य ठिकाणी बदली मिळावी म्हणून बालहट्ट करून प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बद्दलीसाठी राजकीय नेते व लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत आहेत. वडणेरे समिती मधे धरण अंतर्गत जलसाठ्याच्या मधे रिजर्व व्हौयर औपरेशन शड्यूल वर अधिक भर दिला गेलेला आहे. परंतु जो पडलेला पाऊस सोडलेले पाणी. हे पाणलोट क्षेत्रात येत असल्यामुळे सर्व सामान्य शेतकरी व जनतेच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये शिरुन प्रचंड प्रमाणात नुकसान करत आहेत. त्याबाबत वडणरे समितीचा अवहाला बाबत सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प का बसले आहेत. या बाबत जनतेने त्यांना जाब विचारावा. असे विक्रमबाबा पाटणकर यांनी शेवटी म्हणले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा