पाटण तालुक्याला वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले

मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - अगोदरच कोरोनाच्या संकटात असलेल्या पाटण तालुक्यावर हवामान खात्याने दिलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या इशाऱ्या मुळे भीतीचे संकट उभे राहिले होते. मात्र चक्रीवादळा पासून तालुक्याची सुटका झाली. मात्र बुधवारी रात्रीपासूनच तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. चक्री नव्हे पण घोंगावणारे वारे आणि मुसळधार पावसाचा तडाखा यामुळे पाटण तालुका गारठून गेला असून पावसाळ्यापूर्वीच तालुक्याला आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दरम्यान निसर्ग चक्रीवादळाचा इशारा यामुळे पाटण सह परिसरातील लोक दिवसभर घरातच बसून होते. ह्यामुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. पाटण तालुक्याला कोरोनासारख्या महामारी चे संकट असताना त्यातच हवामान खात्याने आणि जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळाने संभाव्य नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरून तालुक्यातील सर्व विभाग नी सतर्क राहून उपायोजना करण्यात आली. खऱ्या अर्थाने एक जून पासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र बुधवारी हवामान खात्याने इशारा दिल्यापासून बुधवारी पहाटेपासूनच पाटण सह कोयना, मल्हारपेठ, मोरगिरी, ढेबेवाडी विभागात चक्री व चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा कहर पाहावयास मिळाला.आजसकाळपासूनच पावसाचा संततधार चालू होती. शिवाय निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा तामकडे एम.आय.डी.सी.तील झाडांना सुद्धा बसला. चक्रीवादळाने जामखेड एम.आय.डी.सी.तील झाड पूर्णपणे अलगद जमिनीतून रस्त्यावर पडले होते.गावातील काही युवकांनी निलेश. सुनील मांडवकर, संतोष संकपाळ हे झाड बाजूला सारण्याचा प्रयत्न केला पण आपल्या बाळा मुळे हे झाड बाजूला सारण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे ये -जा करताना कंपनीतील कामगारांना फिरून जावे लागत होते. निसर्ग वादळ मुंबई ऐवजी पुणे कडून उत्तर महाराष्ट्रात सरकल्याने पाटण वासियांनी आणि दिवसभर रोखलेला श्वास सोडला. सलग बारा तास कोसळत असलेल्या पावसाने नदी, नाले, ओढे, भरून वाहू लागले. झाडांचीही दुर्दशा झाली. यामुळे वातावरणात प्रचंड असा गारठा जाणवत होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा