करोना बाधित खराडे गावास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट

कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड तालुक्यातील खराडे येथे ६ कोरोना बाधीत रुग्ण असून बाहेरून आलेल्या नागरिकांकडून कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी गावास प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले व प्रशासनास सूचना दिल्या.
यावेळी आरोग्य केंद्राच्या नर्सेस व आशा यांनी सुरक्षित राहुन, योग्य खबरदारी घेऊन गावचा होम टू होम सर्वे करून पल्स ऑक्सिमिटरच्या साहायाने लोकांची आरोग्य तपासणी करत आहेत याची माहिती घेतली व संसर्ग वाढू नये म्हणून केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत, तसेच बाधित रुग्णांच्या उपचाराबद्दल माहिती घेऊन, मेडिकल व किराणा या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबद्दल सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी तहसीलदार अमरदीप वाकडे, बी.डी.ओ. आबासाहेब पवार, हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर देशमुख, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, कवठेचे सरपंच लालासाहेब पाटील, मसूर पोलीस स्टेशनचे फौजदार जाधव व जेष्ठ ग्रामस्थ उपस्थीत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा