राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी पाटणमध्ये वृक्षारोपण

मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष व देशाचे नेते खा. शरद पवार यांनी नेहमीच वटवृक्षाची भुमिका ठेवत राज्यासह देशाच्या हितासाठी सकारात्मक भूमिका बजावली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उज्वल परंपरा जपत नेटाने वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापनदिन निमित्ताने वृक्षारोपण करून आपण पर्यावरण रक्षक बनूया. पक्ष आणि जनता यासह आपल्या भावी पिढ्यांसाठी याच चांगल्या शुभेच्छा ठरतील असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१व्या वर्धापनदिन निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघात वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. हा वर्धापनदिन 'वृक्षारोपणा'सारखा एक स्तुत्य उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर आणि मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर या वृक्षांच्या संगोपनाचीही जबाबदारी पक्षाच्यावतीने घेण्यात आली. यावेळी पाटण पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, अध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटण नगरपंचायतचे अध्यक्ष संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष गुरुदेव शेडगे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकर घाडगे व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा