कराड येथील उपप्रादेशिक कार्यालयाचे काहीप्रमाणात कामकाज सुरू - संजय राऊत



         कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशान्वये परिवहन विभागाने नवीन वाहनांच्या नोंदणीचे कामकाज यापूर्वीच सुरू केलेले आहे. शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती व योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण व्यतिरिक्त इतर कामकाज १० जून २०२० पासून काही प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे. सदर कामकाजाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.
        परिवहन विभागाच्या बहुतांश सेवा www. parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध असलेल्या सेवांबाबत ऑनलाईन पध्दतीनेच केलेले अर्ज स्विकारण्यात येतील. अशा सेवांबाबत हस्तलिखीत अर्ज स्विकारले जाणार नाहीत. वाहनाचे हस्तांतरण, बैंक बोजा नोंद, नाहरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत, वाहनात फेरबदल, अनुज्ञप्ती नुतनीकरण/दुय्यम प्रत, इत्यादी कामकाजाची कागदपत्रे कार्यालयीन इमारतीच्या तळमजल्यावरील खिडक्यांवर सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० पर्यंत स्विकारली जातील. सदर कागदपत्रांवर दोन दिवसानंतर कार्यवाही करण्यात येईल. नाकारण्यात आलेले अर्ज त्याचदिवशी सायंकाळी ०५.०० ते ०५.३० या वेळेत संबंधीतांना परत देण्यात येतील असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.
            नागरीक तसेच कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सदर कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. नागरीकांच्या सुविधेकरीता त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल. ज्या नागरीकांचे कार्यालयात कामकाज नाही, अशा नागरीकांनी कार्यालयाच्या आवारात येऊ नये, कार्यालयाच्या आवारात येणा-या सर्व नागरीकांनी मास्क बापरणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टंसिगचे पालन करणे बंधनकारक आहे. असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.