कोरोना वॉरियर्स शिक्षक बांधवाना सुरक्षा साहित्याचे वाटप
जुनी पेंशन हक्क संघटन पाटणकडून अनोखा उपक्रम
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - समाजभान जपणारे संघटन पाटण तालुका जुनीपेंशन हक्क संघटन कामावर प्रेम करणारे शिक्षकांसाठी शिक्षकांनी निर्माण केलेले संघटन या संघटनेने पाटण तालुक्यातील कुंभारगाव व ढेबेवाडी विभागातील कोरोना चेकपोस्टवर शिक्षक बांधव आपला जीव धोक्यात घालून नेमून दिलेल्या ठिकाणी, दिवस-रात्र आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या शिक्षक बांधवाना हँड सॅनिटायजर, फेस शिल्ड मास्क, किट सुरक्षा साहित्याचे वाटप केले.
महाराष्ट्र राज्यासहित संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू संसर्गाने हाहाकार माजविला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेक डॉक्टर, आरोग्य सेवक, परिचारिका, पोलीस हे गेली तीन महिने आपले योगदान देत आहेत. या सर्वांसोबतच शिक्षण विभागातून अनेक शिक्षक बांधव सर्वेक्षण, रेशन दुकान, चेकपोस्ट, संस्थात्मक विलगिकरण केंद्रे याठिकाणी आपली सेवा बजावत आहेत. या शिक्षकांना पाटण तालुका जुनी पेंशन हक्क संघटनेने केलेल्या मदतीने निश्चित त्यांचे मनोबल वाढेल असे उपस्थित शिक्षक बांधवानी सांगितले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल पाटण तालुका जुनी पेंशन हक्क संघटनेचे सर्व स्तरातून अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या उपक्रमाबाबत संघटनेचे अध्यक्ष श्री. रमेश बनकर, सचिव श्री. ओंकार पवार कोषाध्यक्ष श्री. अमोल यादव यांनी मार्गदर्शन केले. पाटण तालुका जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष श्री. रमेश बनकर यांनी या संदर्भात वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले असून या सर्व शिक्षक बांधवाना सुरक्षेसाठी आवश्यक सामग्री प्रशासनाकडून मिळावी यासाठी मागणी केली होती.
पाटण पेंशन फायटर्स चा पुढाकार
शासनाकडून कोणतीही मदत प्राप्त न झाल्याने या सुरक्षा सामग्रीची आवश्यकता लक्षात घेऊन पाटण जुनी पेंशन हक्क संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. विकास चव्हाण, श्री. सुशांत येवले, श्री. ज्ञानेश्वर जाधव, श्री. आप्पासाहेब पाटील व इतर पेंशन फायटर्स यांनी पुढाकार घेतला.
पाटण तालुका जुनी पेंशन हक्क संघटनेच्या मागणीस यश
कोरोना आपत्ती कर्तव्यावर रुजू असणाऱ्या शिक्षक बांधवाना कोरोना कर्तव्य बजावणार्या डॉक्टर, आरोग्यसेवक, परिचारिका, पोलीस या बांधवांप्रमाणे 50 लाखाचे विमा संरक्षण प्राप्त व्हावे यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. रमेश बनकर यांनी फोनद्वारे मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याशी चर्चा करुन निवेदनही दिले होते. पाटण तालुका जुनी पेंशन हक्क संघटनेच्या या मागणीस यश मिळाले असून शासनाने शिक्षकांसाहित कोरोना संबंधित नियुक्त असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा सरंक्षण दिले आहे. याचा लाभ संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे.

धन्यवाद साहेब
उत्तर द्याहटवा