कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघाचे १० जून रोजी रक्तदान शिबिर
ना. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन - जशराज पाटील
कराड (लक्ष्मीपुत्र) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच कोरोना महामारीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने देशाचे नेते आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानुसार कराड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कराड येथे कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघाचे रक्तदान शिबिर मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १० जून रोजी सकाळी १० वा.१० मि. ते दुपारी १ वा.१० मि. पर्यंत आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील (बाबा) यांनी दिली.
ते पक्षाच्या वर्धापन दिन व रक्तदान शिबिर या कार्यक्रमांच्या नियोजन बैठकी प्रसंगी बोलत होते.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेल्या आवाहनानुसार व राज्याचे सहकारमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टंसिंगच्या दृष्टीने मध्यावधी ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कराड येथे सोशल डिस्टंसिंग तसेच योग्य खबरदारी व सुरक्षितता पाळून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच कराड उत्तर व कराड दक्षिण दोन्ही विभागातील कार्यकर्ते तसेच रक्तदाते यांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा