उद्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते बांधावर होणार खत, बियाण्याचे वाटप
शासन पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर
कराड (लक्ष्मीपुत्र) - सातारा जिल्ह्यातील खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे खत, बि-बियाणे शासनाकडून पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर खत-बियाणे देणे सुरु आहे. उद्या दिनांक 11 जून रोजी सकाळी 11 वा. राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उंब्रज मंडळातील निगडी गावच्या शिवारात खत, बियाणे वाटप होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली.
कोरोनामुळे जगभरात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विकसित बलाढय राष्ट्रांनाही याची प्रचंड मोठी किंमत मोजावी लागली. आर्थिक हानी बरोबर मोठी मनुष्यहानी जगभरात झाली. भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून योग्यवेळी लॉकडाऊन जाहीर केले. राज्यानेही याबाबत अग्रही राहून लॉकडाऊन जाहीर केले. लोकांनीही याला प्रतिसाद देत 100 % तूरळक बाबी सोडून लॉकडाऊन पाळला. अर्थचक्र थांबले होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मात्र कृषी क्षेत्र या निर्बंधापासून दूर ठेवले होते. त्यामुळेच सगळे बंद असतानाही रोज हजारो क्विंटल भाज्याची आवक बाजार समित्यांमध्ये होत होती. ती लोकांच्या दारापर्यंत जात होती. सगळीकडे बंद बंद असतानाही अत्यावश्यक, जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीत खंड नव्हता, त्यामुळे घरी बसूनही लोकांपर्यत भाजीपाला पोहचत होता. खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे खत, बि-बियाणे पुरविण्यासाठी शासन या काळात प्रयत्नरत होते. याचाच भाग म्हणून उद्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उंब्रज मंडळातील निगडी या गावाच्या शिवारात जाऊन खत आणि बियाणे वाटणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा