कृष्णा हॉस्पिटलमधून 5 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

कृष्णा हॉस्पिटलमधून 5 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज



           कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड तालुक्यातील इंदोली, गोकुळ-पाटण व उंब्रज येथील एकूण 5 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 116 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
         इंदोली येथील 15 वर्षीय मुलगा, गोकुळ-पाटण येथील 2 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
          यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव अर्चना कौलगेकर, दिगंबर कुलकर्णी, अमृता करंबळेकर, राधिका चिवटे, मनीषा मराठे, अजिंक्य भोसले यांच्या हस्ते कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
         याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.