म्हावशी गावात वादळी वाऱ्यामुळे शेड पडून बैलाचा जागीच मृत्यू

सिताराम किसन मोळावडे यांचे या घटनेत लाखों रुपयांचे नुकसान



            मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - पाटण तालुक्यातील म्हावशी या गावात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे गुरांचे शेड पडून एक बैल जागीच मृत्यू झाला तर दुसरा बैल व म्हैस जखमी झाली. ही दुर्दैवी घटना रविवार  रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली असुन यामध्ये बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर एक म्हैस व बैल जखमी झाले. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
            याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात वादळी वाऱ्यामुळे गुरांचे शेड पडून सिताराम किसन मोळावडे या शेतकऱ्याच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला तर एक बैल व म्हैस जखमी झाली असुन गुरांच्या गोट्याच ही मोठ नुकसान झाले आहे. शेडामध्ये गुरांसाठी ठेवलेला चारा सुद्धा या वादळी पाऊसामध्ये भिजून गेला आहे. सिताराम किसन मोळावडे यांचा शेतीवर उदरनिर्वाह चालतो. पाऊसाळ्यापुर्वी जी शेतातील काम केली जातात ती कामे करण्याअगोदर त्यांच्या बैलाचा मृत्यू झाल्याने या शेतकऱ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यांच्या बैलामुळे शेतातील कामे होत होती पण त्याच्या मृत्यूने आता शेतातील काम थांबली गेली शेतातील काम झाली नाहित तर खायच काय ?  जगायचं कस ?  असे अनेक प्रश्न या शेतकऱ्याच्या पुढ्यात असुन या घटनेत या शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी संबधीत प्रशासनाने सिताराम किसन मोळावडे यांना या संकटातून दुर करून यांना लवकरात लवकर मदत करावी. संबधित घटनेचा महसुल विभागाच्यावतीने गावकामगार तलाठी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.  यावेळी ग्रामसेवक, सरपंच व गावातील पंच उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.