पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते तळबीड प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

इमारतीचे काम हे वेळेत व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे 


            कराड (लक्ष्मीपुत्र) - तळबीड (ता.कराड) येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन ना. बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले.
            लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम तात्काळ पूर्ण होण्याच्यादृष्टीने, सोशल डिस्टन्स बाबत शासनाचे सर्व नियम पाळून सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.
             प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीसाठी रुपये ४९.८३ लक्ष मंजूर झाले आहेत. सदरची इमारत १२.५५ मी. बाय ६.९९ मीटर आकाराची दोन मजली आर.सी.सी इमारत, यामध्ये क्लिनिक रूम, वेटिंग रूम, एक्झामीन रूम, लेबर रूम, लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, टॉयलेट आदी.सोयी सुविधा असून अत्यंत सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे.
              सदर इमारतीचे काम हे वेळेत व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे या संबंधीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना ना. बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.
               याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे,  कराड उत्तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विनिता पलंगे, गट विकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कुंभार, दाजी पवार, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील, संग्रामसिह पलंगे, लालासो वाघमारे, डी.बी. मोहिते  तसेच ग्रामस्थ आरोग्य विभागाचे आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.