2 वर्षाच्या मुलासह आईची कोरोनावर मात

कृष्णा हॉस्पिटलमधून 8 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज



             कराड (लक्ष्मीपुत्र) - येथील कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या 8 जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये 2 वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचाही समावेश होता. या कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 185 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
            जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व तिचा 2 वर्षाचा मुलगा, खराडे-हेळगाव येथील 55 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला, बहुलेकरवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, कालेवाडी-पाटण येथील 46 वर्षीय पुरूष, मारूल-दिवशी येथील 27 वर्षीय युवक, सळवे-पाटण येथील 45 वर्षीय महिला हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
             यावेळी आकाश चौगले, डॉ. नसिमा कणसे, डॉ. हर्षाली पाटील, डॉ. शालू शर्मा, कृष्णा हॉस्पिटलचे कर्मचारी शंकर पाटील, मुसा मुल्लाणी, दिपक कदम, पोपट जाधव, गणेश पाटोळे, जयंत शिंदे, अमोल कांबळे व बबन कदम यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ज़ी. सी. पाटील, डॉ. विनायक राजे, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.