घराघरात रंगला चेस-लुडो चा खेळ

घराघरात रंगला चेस-लुडो चा खेळ

'मीच माझा रक्षक 'आदेशाचे पालन करण्याचे प्रशासनाचे आव्हान

मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - तब्बल एकवीस दिवसांसाठी देशात लॉकडाऊन  जाहीर झाल्यामुळे प्रत्येकाच्या घरी लुडो व चेस चा खेळ चालू झाला आहे.

'मीच आहे माझा रक्षक' या न्यायाने  संपूर्ण जग केंद्र व राज्य सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  आरोग्यमंत्री राजेश टोपे उत्कृष्ट काम करीत आहे. तेव्हा भयावह परिस्थिती ओढवली आहे.ती दूर होईपर्यंत सर्वांनी आदर्शाचे पालन करण्याची गरज आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रत्येक जण कुटुंबातच रममाण झाले आहेत. त्यासाठी सोहम मोबाईल शॉपी गिफ्ट गॅलरी, पाटण या दुकान मालकाने सर्व पाहुणे, मित्र मंडळ यांना चेस व लुडो चा खेळ देण्यात आला आहे. जेणेकरून लोक घरातच राहतील, व घरातच खेळतील, या उपक्रमामुळे दुकान मालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जुन्या गोष्टीही वेळ घालवत आहेत. व्हाट्सअप सर्व प्रसारमाध्यमात कोरोना या ज्वलंत विषयावर चर्चा सुरू आहे. मोठी माणसे त्यात मशगुल आहेत. तर बाल चिमुकले जुन्या गोष्टीची आठवण काढून वेळ घालवत आहेत. इंडोरची  ही तीच अवस्था आढळून येत आहे. मात्र सध्या गंभीर विषयावर उपाययोजना सुरू असल्याने चेस व लुडो गेम खेळुन दिवस करमणूकमध्ये काढले जात आहे. जीव आहे म्हणूनच घराघरात उद्योग सुरू आहेत. तेव्हा आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टीच वेळ घालवत आहे. ज्या घरात आजी, आजोबा आहे तेथे नातवंडे त्यांच्याबरोबर खेळत असून जातक कथा नाही भर आलेला आहे.

'मीच आहे माझा रक्षक' या आरोग्य मंत्र्याच्या आवाहानास प्रतिसाद देऊन कोरोला हद्दपार करण्यास सहकार्य करत आहेत. अन जोपर्यंत कोरोनाच्या निपटारा होत नाही. तोपर्यंत काळजी घेऊया.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.