श्रीमती सुहासिनी पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टची गरजूंना मदतीचा हात
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - समर्थ सुहास चारीटेबल ट्रस्ट पाटण यांच्यावतीने श्री नितीन पिसाळ व समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका श्रीमती सुहासिनी पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लॉकडाऊन चालू झाल्यापासून घरपोच अन्न, रेशन, मास्क, नाश्ता अशा विविध प्रकारच्या मदत ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.
जीवाची पर्वा न करता लॉकडाऊन काळात गोर गरीब लोकांना मदतीचा हात चालू आहे. गोरगरीबासाठी दिवस रात्र झटत समाजसेवा करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल सेवा कार्य करत असलेले पाटण येथील समर्थ चारिटेबल ट्रस्ट हे समाजातील दुर्बल घटकांसाठी कामधेनू ठरत आहे. समाजाच्या गरजेवेळी कंबर कसून जीवनावश्यक व वाण -सामान पात्र गरजू लोकांपर्यंत पोहोचवत आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष मध्ये सामाजिक बांधिलकीचे वारे वाळवंटा प्रमाणे घुमताना दिसते. गेल्या काही दिवसात आजपर्यंत 500 पॉकेट जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे. या समाज सेवा भावी कार्यातून समाजसेवेची ऊर्जा वृद्धिंगत होताना दिसते. त्यावेळी नगरपंचायत पाटणचे स्वच्छता कामगार तसेच ब्राह्मणपूरी पाटण मोरे गल्ली, पाटण सिद्धार्थ कॉलनी, भडकबाबा नगर अशा ठिकाणी शहरातील विविध ठिकाणी वाटप करण्यात आले.
यावेळी सोशल डिस्टन्स पाळून विविध प्रकारची मदत करण्यात आली आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष संजय चव्हाण, राजाभाऊ काळे, फत्तेसिंह पाटणकर, यशवंतराव चव्हाण, रवींद्र सोनवणे, जॉन्सन कुटो, राजेंद्र पाटणकर, विक्रांत कांबळे, नितीन खैरमोडे, शंकर मोहिते, अनिल बोधे, विजयकुमार गायकवाड, सचिन भिंगार्डे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा