निजामुद्दीन येथे मरकजसाठी गेलेल्या नागरिकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह;

निजामुद्दीन येथे मरकजसाठी गेलेल्या नागरिकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह;

कोणत्याही अफवांना बळी पडू नका : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा : निजामुद्दीन येथील मरकजसाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून जिल्ह्यातील लोकांनी कोणत्याही अफवांवर  विश्वास ठेवू नये.  भिती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

 निजामुद्दीन येथील "मरकज" या धार्मिक्‍ कार्यक्रमासाठी गेलेल्या देशातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची (कोविड-19) बाधा झाली आहे.  सातारा  जिल्ह्यातील जे 7 नागरिक मरकज साठी गेले होते तसेच शासनाकडून मरकजशी निगडीत असलेल्या 5 नागरिकांची नावे आली होती.  त्या सर्वांच्या स्त्रावांचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविले होते.  त्या बारा जणांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सुचना नुसार त्यांना संस्थात्मक अलगीकरण (क्वॉरंटाईन) मध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

 लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन वेळच्यावेळी प्रसार माध्यमांद्वारे वस्तूनिष्ठ माहिती देत आहे.  त्यामुळे जनतेनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनानी ज्या  प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्या काटेकोरपणे पाळाव्यात.   या काळात घरात बसून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक देणे हेच सर्वांकडून अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.