महाराष्ट्र बँक लघुशाखा चालकांची लॉकडाऊनमध्ये अखंडित सेवा

ग्राहकांची झटपट काम होत असल्याने ग्राहकांमध्ये समाधान

               मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - कोरोनो विषाणूची ग्रामीण भागात मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिक घराबाहेर पडण्यात नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र ग्रामीण भागातील बँकेचे लघुशाखा चालक या लॉकडाऊन कालावधीत जीवाची परवा न करता अखंड सेवा पुरवत असल्याने गर्दीचा ताण कमी होऊन ग्राहकांची झटपट काम होत असल्याने ग्राहक समाधान व्यक्त करीत आहेत.
                कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावागावातून जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळत आहे. तर अत्यावश्यक सेवा समजल्या गेलेल्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळली जात आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील बँक मित्र आपल्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे लॉकडाऊनच्या  काळातही आपली सेवा ग्राहकांना देत आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या याच सेवेमुळे ग्रामीण भागातील लोकांना चलनाचा तुटवडा जाणवत नाही. ग्रामीण भागातील लोकांचे येथील बँक ऑफ महाराष्ट्रशी जिव्हाळेचे नाते आहे. यांच्यातर्फे नियुक्त बँक मित्रांकडून लोकांमध्ये मिळत असलेल्या बँक सेवेबद्दल ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत.
                बँक चालक रत्ना मांडावकर यांनी सर्व मोरना विभाग वाडीकोतावडे, तामकडे, येराड, कोकिसरे, कोरडेवाडी,  गवळीनगर या भागात जाऊन पंतप्रधान योजनेतून 500 रु जमा झाले होते. व जर कोणाला अकाउंट मधून पैसे काढायचे असेल तर 7744070947 या नंबर वर कॉल करावा असे बँक लघुशाखा चालक यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे. कोणतीही एक्सट्रा फी न घेता हे काम 1 महिन्यापासून लॉकडाऊन काळात करण्यात येत आहे. तसेच बँकेने हातमोजे, मास्क आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. बँकमित्र येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टnsing पाळायला लावताना त्यांच्या हातावर सॅनिटयजर लावत आर्थिक व्यवहार पार पाडले जात आहेत.
                जनधन खात्यावर सरकारने जमा केलेली रक्कम मोठया प्रमाणावर लोकांनी बँकमित्रकडून खात्यातून काढली आहे. यासाठी कोकिसरे उपसरपंच कृष्णत साळुंखे, विनोद सावंत, अभय पवार, दादासो सुर्वे, सर्व ग्रामपंचायत सद्यस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. या बँकमित्र करून राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या उपक्रमामुळे बँकांमध्ये होणारी गर्दी कमी झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.