आयसीआयसीआय बँकेची बचत गटांनी घेतलेल्या कर्ज हप्त्यांना तीन महिन्यापर्यंत स्थगित

आयसीआयसीआय बँकेची बचत गटांनी घेतलेल्या कर्ज हप्त्यांना तीन महिन्यापर्यंत स्थगित
             
               हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - सर्व सीएमआरसी व्यवस्थापक, क्षेत्रीय समन्वयक, लेखापाल, सहयोगिनी, सीआरपी यांना कळविण्यात येते की, कोविड-19 च्या प्रादुर्भवामुळे जगभरात एक भितीचे आणि चिंताजनक वातावरण तयार झाले आहे.आपल्या देशात कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता लागू केलेल्या लॉकडाऊनसह अन्य प्रकारच्या निर्बंधामुळे देशातील आर्थिक व्यवहार मोठयो प्रमाणावर विस्कळीत झाले आहेत.सर्व कमधंदे सद्या बंद असल्यामुळे रोजी रोटीसाठी घराबाहेर निघू शकत नाही. त्यामुळे गरीब व गरजू लोकांनी विविध बँकांकडून घेतलेलं कर्ज अशा परस्थितीत वेळेवर परतफेड करु शकत नाहीत, म्हणून रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना केलेल्या सुचणेनुसार विविध सरकारी व खाजगी बँकांनी त्यांच्या कर्जदार ग्राहकांना कर्ज परतफेडीच्या मासिक हाप्त्याची वसूली तीन महिन्यापर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
              आयसीआयसीआय बँकेने सुद्धा बचत गटांनी घेतलेल्या कर्जाकरिता मासिक हप्ताची वसूली तीन महिन्यापर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असून माहे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यातील हप्त्यास स्थगिती दिली आहे. परंतु आपल्या बचत गटांनी मार्च 2020 चा हप्ता भरल्यामुळे व तो हप्ता कर्ज खात्याला वर्ग  झाल्यामुळे आता केवळ पुढील 2 हफ्ते म्हणजे एप्रिल व मे या दोन महिन्याच्या हत्यास स्थगिती दिली आहे. आता सर्व बचत गटांनी जून 2020 ला हप्ता भरायचा आहे. सदरील हप्ता हा 31 मे नंतर  बँकेत भरता येणार आहे.
             यामध्ये कोणत्याच बचत गटाला एप्रिल व मे चे दोन हप्ते एकत्र भरण्याची आवश्यकता नाही. तर फक्त एकच हप्ता जो नियमित आहे तो भरायचा आहे. मात्र सदरील दोन महिन्याचे अतिरिक्त व्याज बचत गटास शेवटी भरावे लागणार आहे. ज्या बचत गटांनी  माहे एप्रिल चा हप्ता बँकेत रोख अथवा ऑनलाइन भरला असेल तो तसाच त्यांच्या बचत खात्यात रक्कम राहील, ते कर्ज खात्याला वर्ग होणार नाही म्हणजे कर्जातून कमी होणार नाही.ज्या बचत गटांना रेग्युलर हप्ता भरायचा आहे त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या  9594744440 या  मोबाइल नंबर व त्या गटाचा नोंदणी केलेल्या (ज्या मोबाइल नंबर वर बँकेचा मेसेज येतो) त्या मोबाइल वरुण मिसकॉल दिल्यानंतर त्याचा रेग्युलर हप्ता कपात होणार आहे.
           ज्या बचतगटांना खात्री आहे की, पुढील 2 महीने ते रेग्युलर हप्ते भरू शकतील त्याच गटांनी त्यांच्या नोंदीकृत मोबाइल नंबर वरुण दिलेल्या नंबर वर मिसकॉल करायचे आहे. ज्या गटाने रेग्युलर हप्ता भराला पण missed call दिला नाही तर त्यांचा हप्ता कपात होणार नाही. त्यामुळे त्यांना पण जास्तीचे व्याज भरावे लागेल, या करिता missed call देणे आवश्यक आहे. ज्या बचत गटांचे शेवटचे 2 ते 3 हप्ते बाकी आहेत त्यांना जर सर्व रक्कम भरून लोन नील करायचे असेल तर बॅंकेशी संपर्क साधून ते लोण four close करता येईल.सर्व सीएमआरसी स्टाफ ने सदरील माहिती प्रत्येक बचत  गटास देण्यात यावी व काही शंका असल्यास बॅंकेशी संपर्क साधावा असे आवाहन बँकेतील करण्यात आलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.