कराड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या 60 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह

कृष्णा हॉस्पीटल कराड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या 60 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ;

सातारा येथील 9 तर कराड येथील 6 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ;

सातारा - कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आलेल्या 7 अनुमानित रुग्णांपैकी  60 वर्षीय पुरुष  कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित 6 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत 9 निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले असल्याचे एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे

काल 6 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 2 रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. या एकूण 16 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले आहेत. तसेच काल दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा  येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला 25 वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री 1 च्या सुमारस त्याला कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या नियमानुसार उपचार चालू आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.