बारगे कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी
वाढदिवसाचे औचित्य साधून हुपरीतील 200 गोरगरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे त्यामुळे सरकार लॉक down ची मुदत पण वाढवत आहे.याचा मोठा परिणाम उद्योग क्षेत्रावर होत आहे.सर्व कारखाने, व्यापार, उद्योग, व्यवहार बंद असल्याने काम बंद आहे. संचारबंदी असल्याने लोक बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रोज काम करून पोट भरणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. आपला उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सर्वसामान्य गरीब लोकांपुढे आहे. अशा लोकांना समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे होऊन मदतीचा हात देऊन माणुसकी जपली पाहिजे. याच भावनेतून हुपरी येथील चांदी उद्योजक श्री चंद्रकांत बारगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारगे परिवाराने हुपरीतील 200 गोरगरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देऊन आपली सामजिक बांधिलकी जोपासली आहे.
तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल, तूर डाळ, मसूर डाळ, चटणी, बिस्कीट, मास्क आदि वस्तूचे किट करून त्यांचे वाटप केले.ज्येष्ठ नेते श्री महावीर गाट आण्णा, श्री चंद्रकांत बारगे, हुपरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट, मुख्याधिकारी सौ. कुंभार मॅडम, नगरसेवक रफिक मुल्ला यांच्याहस्ते ह्या वस्तूचे वाटप करण्यात आले.
सर्वांचे स्वागत शितल चंद्रकांत बारगे यांनी केले.यावेळी विशालनागर विकास मंडळचे अध्यक्ष श्री वसंतराव माळी, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सदस्य, वीर सेवा दल प्रांत प्रमुख अजितकुमार पाटील, सिल्व्हरबाईज चे सदस्य, सर्व युवा मित्र परिवार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी सर्वांचे आभार सुनिल चंद्रकांत बारगे यांनी मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा