हुपरीमधील तरुणांनी बनविली कोरोना आपत्तीवर शॉर्टफिल्म

हुपरीमधील तरुणांनी बनविली कोरोना आपत्तीवर शॉर्टफिल्म

हुपरी (लक्ष्मीपुत्र) - कोरोना संसर्गाच्या संकटाला सर्वजण तोंड देत आहेत. सोशल मिडीयावरुन यासंदर्भात सातत्याने प्रबोधन केले जात आहे. या प्रबोधनाचाच एक भाग म्हणून हुपरीतील सामाजिक क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या चार तरुणांनी बंदिस्त ही शॉर्टफिल्म बनविली असून सद्या हुपरी परिसरात ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

सोशल डिस्टन्सेसचे नियम पाळत एक दुचाकीस्वार आणि एक कॅमेरामन यांनी सद्याच्या लॉकडाऊन स्थितीची क्षणचित्रे टिपली त्यांना एका कथेत गुंफले आणि एक छान अशी शॉर्टफिल्म उदयाला आली.
नगरपरिषद प्रशासन, पोलिस खाते, आरोग्य खाते यांच्या लॉकडाऊन परिस्थितीतील कामकाजाचे वास्तव अतिशय सुंदर रितीने मांडले आहे.

मंदिरे बंद झाली परंतू या सर्वांच्या रुपाने देवाचे काम सुरुच आहे ही संकल्पना यामध्ये मांडली आहे.दख्खन फिल्मस, व साई एंटरटेनमेंट बॅनरच्या " बंदिस्त" या शॉर्टफिल्मची संकल्पना दिग्विजय खाडे यांची असून कथा पटकथा भाऊ खाडे यांची आहे.

सुमित बुडके यांनी चित्रीकरण केले असून आकाश काटकर यांनी ध्वनीमुद्रण केले आहे. पूरपरीस्थितीवरील नदी वाहते लघुपटाचे यशस्वी दिग्दर्शक  विराम बहादूरे यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे.

रवि पायमल, रविंद्र चौगुले, सागर खाडे, दिपक गोंधळी या कलाकारांच्या अभिनयाने ही शॉर्टफिल्म सजली आहे.लॉकडाऊनच्या काळात सर्वांचे प्रबोधन करणारी, जबाबदारीची जाणीव करुन देणारी शॉर्टफिल्म " बंदिस्त " ही सोशल मिडीयावर चांगलीच गाजत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.