82 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर...

74 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

           सातारा - कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 56, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 25, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 1 असे एकूण 82 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच काल दि. 29 एप्रिल रोजी रात्री उशिरा  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 20, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 54  असे एकूण 74 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.