ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारीआणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण - ना. हसन मुश्रीफ 

ग्रामसेवकग्रामविकास अधिकारीआणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षणग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे 

कोरोनाविरुद्धच्यालढ्यातील सैनिकच


मुंबई - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारीयांच्याबरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचेग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकारसेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक (संगणकपरिचालक) यांनाही २५ लाख रुपयांचे विमा संरक्षणदेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीराज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाचा प्रदुर्भावरोखणे, यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत घरोघरी जाऊनलोकांचे प्रबोधन करणे, संशयीत रुग्णांना मार्गदर्शन वमदत करणे यासाठी गावपातळीवरील अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालकआदी सर्वजण अहोरात्र काम करीत आहेत. जीवाचीजोखीम पत्करुन काम करणारे ग्रामीण पातळीवरील हेसर्व कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातीलसैनिकच आहेत. केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठीकार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाख रुपयांचा विमाउतरविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ग्रामीणभागात या कामात इतर ग्रामीण कर्मचारीही कार्यरतअसल्याने राज्य शासनाने ३१ मार्च रोजी परिपत्रककाढून गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना ९०दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचानिर्णय घेतला आहे. आता हा निर्णय अधिक व्यापककरुन यामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणिसंगणक परिचालक यांचाही समावेश करण्यात आलाअसून आता त्यांनाही ९० दिवसांकरीता २५ लाखरुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनीसांगितले.

संगणक परिचालक हे कंत्राटी पद्धतीवर कार्यरतकर्मचारी आहेत. तरीही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात तेगावागावांमध्ये जीवाची जोखीम पत्करुन काम करीतआहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हेही अहोरात्रकाम करीत आहेत. त्यामुळे त्यांना विमा संरक्षण देण्याचानिर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतलाअसल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भात३१ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकात दुरुस्ती करणारेशुद्धीपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे.

दरम्यान, ३१ मार्च रोजीच्या परिपत्रकान्वयेगावांमध्ये कोरोना रोखण्यासाठी कार्यरत अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारीयांना त्यांच्या नियमीत वेतनाव्यतिरिक्त १ हजार रुपयेअतिरिक्त रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानेघेतला असून त्यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचनापाठविण्यात आल्या आहेत. लवकरच हे मानधन याकर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे, असे श्री. मुश्रीफ यांनीसांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.