कृष्णा हॉस्पिटलमधील 44 कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

कृष्णा मेडिकल हॉस्पिटलमधील 44 अनुमानितांचे

रिपोर्ट आले निगेटिव्ह


सातारा दि. 10 ( जि. मा. का ): सातारा जिल्हा रुग्णालय व कृष्णा मेडिकल हॉस्पिटल येथे सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवातील तसेच श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे अशा विविध आजारांमुळे 64 अनुमानित रुणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या 64 अनुमानित रुग्णांच्या घाशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपसणीसाठी पाठविण्यात आले होते.  या सर्व 64 अनुमानितांचे  रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

यामध्ये सातारा जिल्हा रुग्णालयातील 12 पुरुष व 8 महिलांचा तर कृष्णा मेडिकल हॉस्पिटलमधील 16 महिला व 7 महिन्याच्या बालिकेचा आणि 27 पुरुषांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.