गरीब कुटुंबाना वीर सेवा दलाचा मदतीचा हात
गरीब कुटुंबाना वीर सेवा दलाचा मदतीचा हात
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - कोणत्याही आपत्तीवेळी मदतीला धावून जाणे ही वीर सेवा दलाची परंपरा आहे. सध्या कोरोनच्या पार्श्वभूमीवर देशात, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक उद्योग, कारखाने, व्यापार बंद असल्याने लोकांचा रोजगार बुडाला आहे.रोज काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची अडचण झाली आहे. हाताला काम नसल्याने गोरगरीब कुटुंबाना रोजच्या जीवनावश्यक वस्तू मिळणे अवघड झाले आहे.या गोष्टीचा विचार करून वीर सेवा दल हुपरी यांच्यावतीने हुपरीतील 75 गरीब कुटुंबाना रोजच्या आहारातील जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, साखर, पोहे, तेल, तूरडाळ, मूगडाळ या साहित्याचे कीट देण्यात आलेले आहे.
कोरोनाच्या आपत्तीवेळी वीर सेवा दल हुपरीच्यावतीने 2000 मास्कचे वाटप, रक्तदान शिबिर,भाजीपाला वाटप व आता गरीब कुटुंबाना धान्य वाटप असे उपक्रम घेऊन आजपर्यंत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी प्रांतप्रमुख अजित पाटील, संघनायक अभिनंदन सौंदत्ते, उपसंघनायक सुनील गाट, सचीन पाटील, संयोजक चेअरमन संतोष पाटील, जंबू उमाजे, सचीन झोले, वैभव पाटील, सुहास सपाटे, दादू गाट, अभिनंदन पाटील, बाहुबली नेमीनाथ गाट, आशिष मायगोंड, विशाल बुगटे, राजू गाट, श्रेणीक गाट, अमर इग्रोळे, पप्पू बाळिकेई, प्रणव पलसे, सचिन सावळे, सुनील पुरंदर गाट, महेश श्रीपण्णावर, सचीन म्हाकान, राजू गाट, शितल बरगाले व वीर सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा