समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप
पाटणचे समाजसेवक नितिन पिसाळ यांनी जपली सामाजिक बांधिलकी
पाटण लक्ष्मीपुत्र (श्रीगणेश गायकवाड) - पाटण येथील समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक, समाजसेवक नितिन पिसाळ यांनी गोरगरीब गरजू कुटूंबांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करून लाॅकडाऊनच्या काळात मदतीचा हात दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊनमुळे मोल-मजुरी करणाऱ्या गोरगरीब लोकांचा रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 14 एप्रिल रोजी बोंद्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावातील 20 कुटुंबांना घरपोच जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
पाटण परिसरातील गावांत विटभट्टी मजूर, बांधकाम मजुर व पोटासाठी मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा मोठा वर्ग आहे. सध्याच्या लाॅकडाऊनमुळे या लोकांची मजूरी बंद झाल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे, याची माहिती मिळताच पाटण येथील समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने संचालक नितीन पिसाळ यांनी पाटण गावांतील गोरगरीब गरजू लोकांना मदत केली असून सदैव गोरगरीब, गरजू लोकांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे.
पाटण, म्हावशी, मुळगाव, येराड, तामकडे, काहीर, बोंद्री, येरफळे, नेरळेगौंड, निवकणे, मणदूरे आदी ठिकाणच्या गरजू 240 कुटूंबांना लाॅकडाऊनपासून धान्य, साखर, चहापावडर, तेल, डाळी,पोहे अशा जीवनावश्यक साहित्यांची मदत पोहच करून सामाजिक बांधिलकी जोपासत याअगोदर पाटण येथे उदभवलेल्या पूरपरिस्थितीत गरजूंना मदत मिळवुन देण्यासाठी कार्यरत होते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊनमध्ये गरजू गोरगरीबांना मदत याचबरोबर प्रशासनास देखील मदत करण्यासाठी नितिन पिसाळ सदैव कार्यरत आहेत.त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल जनतेतून कौतुक होत आहे.
यावेळी पत्रकार संजय कांबळे, अरविंद जाधव, महेश आटकेकर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा