कुसुरुंड गावामधील सामाजिक वनीकरण मजुरांचे मदतीविना हाल
कुसुरुंड गावामधील सामाजिक वनीकरण मजुरांचे मदतीविना हाल
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - कुसरुंड गावामधील सामाजिक वनीकरण मजुरांचे अन्नविना रोज हाल होत आहेत. सामाजिक वनीकरण हे मजूर लॉकडाऊन झाल्यापासून त्यांच्या हाताला काम नाही. गावी निघाले होते परंतु लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना परत कुसरुंड या गावी पाठवण्यात आले.
प्रशासनाने त्यांना अन्न-धान्यांचा काही पुरवठा केलेला नाही. त्या मजुरांच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. डोंगरात जे काम झाडांची मिळते ते काम करत असतात रस्त्यालगतचे जे मजूर आहेत त्यांना अन्नपुरवठा केलेला आहे.परंतु प्रशासनाने हे मजूर कुसरुंड गावात असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यांचे मूळ गाव आहे तेथे प्रशासनाने परत पाठवावे. किंवा त्यांना अन्न, तांदूळ, ज्वारी व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावे.
लॉकडाऊन झाल्यापासून कुसरुंड गावचे सरपंच केशव खशाबा पवार यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना मदत केलेली होती. पण त्यांना रोज मदत करणे अशक्य आहे. त्या मजुरांना विचारले असता त्यांनी सांगितले, कृपया शासनाने आम्हाला गावी तरी पाठवावे. किंवा अन्नपुरवठा तरी करावा. आमच्याकडे जे पैसे होते ते सुद्धा आता संपले आहेत. तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. याठिकाणी एकूण 15 ते 20 मजूर आहेत. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सतीश पवार, वनमजूर चंद्रकांत घाडगे यांनी या मजुरांना परत गावी पाठवावी अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा