कराड तालुक्यात कोरोनाचे ५ नवे रुग्ण

कराड तालुक्यात कोरोनाचे ५ नवे रुग्ण

            कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोना विषाणुने पुणे मुंबई शहरांसोबत आता ग्रामिण भागातही चांगलेच पाय रोवले आहेत. आज कराड तालुक्यात कोरोनाचे नवीन ६ रुग्ण पोझिटिव्ह सापडले असून यामुळे सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहोचली आहे.
          आजच्या आकडेवारीनुसार  कराड तालुक्यात सध्या कोरोनाचे ३० कोरोना बाधित रुग्ण आहेत. सातारा जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यात असल्याने सध्या कराड शहर आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यानी येथील अनेक भागांत कलम १४४ लागू केले असून संपुर्ण संचारबंदी जारी केली आहे.
           दरम्यान आज आणखी २ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. आता आज पुन्हा नवे ५ रुग्ण सापडल्याने कराडकरांची चिंता वाढली आहे. आज फलटण येथेही एक कोरोनारुग्ण सापडला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.