हुपरीत टायगर ग्रुपच्यावतीने गरीब कुटुंबाना धान्य वाटप
हुपरीत टायगर ग्रुपच्यावतीने गरीब कुटुंबाना धान्य वाटप
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने हुपरीतील गोर गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले. ज्यांच्या चुली पेटल्या नाहीत आशा गरिबांना शोधून त्यांना मदत करण्यात आली आहे.
पन्नासहून अधीक कुटुंबाना ही मदत करण्यात आली असून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे अध्यक्ष केशव भाऊ राखपसरे व सांगली जिल्हा अध्यक्ष पिंटू माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी हुपरी पोलिस स्टेशनपोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, जेष्ठ पत्रकार व माजी नगरसेवक अमजद नदाफ, धनंजय डिसले, सचिन गाठ, मराठीयन चनेल चे समीर पाणारी, नगरसेवक जयकुमार माळगे उपस्थित होते.
टायगर ग्रुप हुपरी प्रमुख सदस्य उमेश उर्फ पप्पू लोंढे, प्रसाद देसाई, राहुल हजारे , सुमीत पाटील, सौरभ देशमुख, गणेश घोरपडे, संतोष सकट यांनी आज परिसरातील गरजू गरीब कुटूंबातील लोकांना धान्यवाटप केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा