लॉकडाऊनच्या काळात मोरणा विभागात दारू, मटण, गुटखा व पेट्रोल जोमात
संचारबंदीचे उलंघणच नव्हे तर संचारबंदीची ऐशी की तैशी
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि सध्या सुरू असलेले संचारबंदी म्हणजेच लॉकडाऊन याच लॉक डाऊनच्या काळात पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील पेठशिवापुर, मोरगिरी येथे अवैध्य धंद्याचे पेवच आले आहे.यामध्ये दारू, गुटखा, मटण व पेट्रोल हे सरास विकले जात आहे. यामुळे अवैध् धंदे करणाऱ्यांनी संचारबंदीचे उलंघणच नव्हे तर संचारबंदीची ऐशी की तैशी करूनच टाकली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोरणा विभागातील मुख्य बाजारपेठ असलेले पेठशिवापुर, मोरगिरी या विभागातील जवळ जवळ १८ ग्रामपंचायती व वाडी वस्ती वरील लोक येत असतात. या सर्वच लोकांचे पेठशिवापुर, मोरगिरी येथील व्यापाऱ्यांनी आत्यावशक खरेदी करताना दर वाढवून व हिशोब करताना होशोबमारी करून अक्षरशः कंबरडे मोडले आहे. यातच गुटखा, दारू, मटण व पेट्रोल या सारखे सुरू असलेले अवैध्य धंदे यांनी तर रेकॉर्ड ब्रेकच केले आहे.पाटण व नावारस्ता हे दोन्ही ठिकाणे दोनच दिवसापासून सध्या कंटेन मेंट झोन मध्ये आहेत. माणगाव वरून गुंजाली रस्ता, आडदेव रस्ता तर कधी वाडिकोतावडेचां पुल याठिकाणी तर पेठशिवापूर येथे दारू विकली जात आहे. यामुळे सायंकाळी ४ वाजण्याच्या पुढे विनाकारण रस्त्यावर दुचाकी घेऊन फिरणारे तळीराम दिसतात. तर या तळीरामाना घरी दारू पुरवणारे मोरगिरी येथील काही भुरटे शाळेच्या बॅगा पाठीवर आडकवून फिरतात.
मटण विक्रेत्यांनी तर कहरच केला आहे. सरकारने मटण पार्सल विक्री ठराविकच वेळेत करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पेठशिवापूर मधील बहादर चोरी चुपके कायमच मटण चढ्या दराने विकत आहेत.तर गुटखा तांबवे, बेलवडे या गावातून विक्रीसाठी येत आहे.फक्त आत्यावाशक सेवा असणार्या वाहनांना पेट्रोल देणे बंधकारक असूनही पेठशिवापुर, मोरगिरी, नेरळे, आंब्राग या ठिकाणी १५० रूपेये लिटरने पेट्रोल विकले जात आहे . त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात दारू, मटण, गुटखा तसेच पेट्रोल हे अवैध्य धंदे करणाऱ्यांना कोठून मिळते व कुणाचे आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
मात्र फक्त अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. तरीही असे अवैध्य धंदे व बिगर अत्यावश्यक सेवा कसे चालतात व कोणामुळे चालतात हा प्रश्न विभागतील जनतेला पडत आहे.तर या वर अंकुश ठेवणारा संबधित विभाग हा संपूर्ण देशात कोरोना विषाणुमुळे व्यस्त आहेच, आणि या बद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. मात्र मोरणा विभागात परस्थिती मात्र निराळीच आहे. लॉकडाऊन काळात हे अवैद्य धंदे कोणाच्या मेहरबानीने चालले तर कोणाची बिर्याणी, कोणाची दारूची बॉटल, कोणाची मटण तर कोणाचे चिरीमिरी घेऊन तर अत्यावश्यक सेवेत नसणारी पेठशिवापुरातील कोणाचे चायनीज तर कोणाचे हॉटेल सुरू, कसे सुरू होते. तर कोणाचे अवैध्य धंदे हा सगळाच पाढा मोरणा विभागतील जनता गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे वाचून जो दोषी आहे त्यावर कडक करा असे निवेदन देऊन याचा पर्दाफाशच करणार आहे.आजचा काळ बोलण्याचा नाही म्हणूनच गप्प आहे असे विभागातील प्रमुख कार्यकर्त्यानी व जनतेने सांगितले.
मोरगिरी बिटला कार्यतत्पर पोलीस असणे गरजेचे. मोरगिरी बिटला पूर्वी असलेले के. टी. गोतपागर यांनी विभागाची चांगली घडी बसवली होती. परंतु त्यांची दुसऱ्या बिटला बदली झाल्या नंतर चर्चेतून मिटणार्या केसेस पोलीस स्टेशनपर्यंत येऊ लागल्या आणि त्या परत कोर्टात जाऊ लागल्या आता. गोतपागर दादांना परत आणुया यासाठी काही ग्रामपंचायतींनी ठरावही तयार केले आहे. मात्र त्यातच संचारबंदी चालू झाली, आणि यातच चाललेला सावळा गोंधळ दिसू लागला. आणि मोरणा विभागाला पुन्हा कार्यतत्पर बीट पोलीस असणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रीया लोकांमधून उमटू लागल्या आहेत.
ऑनड्युटी असलेले पोलीस देशमुख व होमगार्ड लाड यांचे होतंय कौतुक.
संचारबंदी सुरू झाली आणि सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दीपक देशमुख व होमगार्ड प्रवीण लाड यांनी विभागातील सर्वच गावात करडी नजर ठेवत बाजारपेठ असलेल्या पेठशिवापुर,मोरगिरी याठिकाणी चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेवले आहे.सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत खडा पाहरा ठेऊन कोण क्रिकेट खेळत आहे ते पाहणे तर कोण मुंबई वाला आहे हे पाहणे तर कधी पत्ते खेळणारे पळवणे असे करत काम करणे तर कधी कधी विनाकारण दुचाकी वरून फिरणाऱ्याना काठीचा प्रसाद ही द्यायला कमी पडले नाहीत त्यामुळे त्यांच्या कामाचे विभागातून चांगलेच कौतुक होत आहे.
सोनवले मॅडमचे नियोजन योग्य मात्र त्यांच्या पाठीमागे वेगळेच उद्योग.
पाटण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवले ह्या महिला अधिकारी असूनही तालुक्याचा कार्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत.मोरणा विभागात संचारबंदी सुरू झाले पासून एक दोन दिवसांनी स्वतः येऊन व्यापारी, ग्रामपंचायत तसेच त्यांच्या कर्मचारी यांना सूचना देऊन योग्य नियोजन करत आहेत.मात्र त्यांच्या पाठीमागे काही वेगळाच कारभार चालला आहे. अतिरिक्त असलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांची दिवसभर अक्षरशः दमछाक होत आहे. मग हे सर्व व्यवस्थित असूनही अवैध्य धंदे किंवा इतर प्रकार कोणामुळे चलतायात याचा अभ्यास आता खुद्द पाटणच्या पोलीस निरीक्षक यांनी करून "कुंपणच शेत खातंय का? याचा शोध लावा अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा