कराड उपजिल्हा रुग्णालयातील आठ कर्मचार्यांना कोरोनाची लागण
कराड उपजिल्हा रुग्णालयातील 8 कर्मचार्यांना कोरोनाची लागण
कराड लक्ष्मीपुत्र - कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील आठ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खबरदारी म्हणुन रुग्णालयातील सर्व कर्मचार्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये ६ कर्मचार्यांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकिय महाविद्यालय, पुणे यांनी कळवले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांनाच कोरोनाची बाधा झाल्यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कराड तालुक्यात महिणाभरात तालुक्यातील रुग्णसंख्या 40 वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यात असल्याने इथे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरिही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा