सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडून 2000 सॅनिटायझर ची मदत
पाटण प्रशासकीय यंत्रणेला मदत
पाटण लक्ष्मीपुत्र (श्रीगणेश गायकवाड) - पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण अर्बन बँक, पाटण तालुका खरेदी विक्री संघ, श्रीराम नागरी संस्था, पाटण एज्युकेशन अॅन्ड डेव्हल्पमेंट ट्रस्ट यांच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघातील डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सर्कल यांंच्यासाठी 2000 बॉटल्स सॅनिटायझर मदत म्हणून देण्यात आले. यावेळी पाटणकर यांनी सर्व अधिकार्यांचे कौतुक केले.
पाटण तालुक्यामध्ये मुंबई-पुणे व इतर मोठ्या शहरांमधून आलेल्या लोकांची संख्या जास्त असतानाही आपण सर्वांनी लॉकडाऊन मध्ये केलेल्या चांगल्या नियोजनामुळेच कोरोनाचा प्रसार रोखण्यात व नियंत्रीत ठेवण्यात आपल्याला यश आले आहे, असे गौरव उद्गारही त्यांनी यावेळी काढले. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित अधिकार्यांचे अभिनंदनही केले व कोरानावर सर्वजण एकत्र येऊन नक्कीच मात करु, असा विश्वासही व्यक्त केला.
सध्या संपूर्ण जगभर कोरोनाशी एक प्रकारे लढाईच सुरू आहे. या लढाईमध्ये डॉक्टर, पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, विविध विभागांचे सरकारी अधिकारी व कर्मचारी आपली जबाबदारी एखाद्या योद्याप्रमाणे चोख बजावत आहेत. पाटण तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रसार सध्या तरी अटोक्यात आहे. एक-दोन अपवाद वगळता कोराना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले नाहीत. याचे श्रेय पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय व पोलीस यंत्रणेला द्यावेच लागेल. कोरोनावर मात करावयाची असल्यास सर्वांचे आरोग्य चांगले राहणे व त्यांना कोरोनाची लागण न होणे अतिशय महत्त्वाचे आहे. या लढाईमध्ये ही सर्व मंडळी एखाद्या देवदुताप्रमाणे सर्व सामान्य जनतेची ढाल बनुन रांत्र-दिवस काम करत आहेत. त्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून पाटणकर यांनी 2000 बॉटल्स सँनिटायझर उपलब्ध करुन दिले. या मदतीसाठी पाटणकर यांचे सर्व अधिकार्यांनी आभार मानले.
यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी सौ. मिना साळुंखे, पाटण नगरपंचायतचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, सर्व संस्थांचे चेअरमन, पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा