नगरपरिषद, नगरपंचायतीचे कामगारांचे आज काळ्या फीती लाऊन काम
नगरपरिषद, नगरपंचायतीचे कामगारांचे आज काळ्या फीती लाऊन काम
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - कोरोना लढाई मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद, नगरपंचायतीचा कामगार जीवाची पर्वा न करता लढत आहे.कोरोना लढ्यामध्ये शासकीय कामगारांना, आरोग्य कामगारांना शासनाने वीमा कवच दिले.मात्र नगरपरिषद, नगरपंचायत कामगारांना डावलले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद व नगरपंचायती कर्मचारी संघटनेने शासनास तीन पत्र देऊनही दखल न घेतल्याने शासनाचे लक्ष वेधन्यासाठी राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीचे कामगार अाज दिनांक २७ एप्रिलला काळ्या फीती लाऊन काम करतील असे पत्रही शासनाला दिले आहे.परंतु शासनाला नगर परिषद नगर पंचायत कामगारा बाबत कोणतीही घेणे देने दिसत नाही.
त्यामुळे आज दिनांक २७ एप्रिल ला सर्व नगरपरिषद नगरपंचायती मधील कामगार काळ्या फीती लाऊन काम करनार आहेत. कामामध्ये कोणीही कसूर करणार नाहीत अथवा काम बंद करणार नाहीत. पण झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी नाईलाजास्तव हा मार्ग संघटनेच्यावतीने घेणेत आला आहे.
कामात कुचराई करणाऱ्या कर्मचारी यांचेवर कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या शासनास त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेच जबाबदारी ची जाणीव नाही या गोष्टीचा निषेध म्हणून उद्या काळया फिती लावून काम सुरू ठेवणेत येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा