मराठी पत्रकार संघ पाटणचेवतीने नाष्टा व मास्क वाटप

मराठी पत्रकार संघ पाटणचेवतीने नाष्टा व मास्क वाटप

          मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - कोरोणा विषाणु संदर्भात 21 दिवस संपुर्ण देश लॉकडॉउन केला असताना अशा कठीण परीस्थितीत आपला जीव धोक्यात घालुन कर्तव्य बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्मचारी यामधे पोलिस कर्मचारी, महसूल कर्मचारी, व गँस वितरण कर्मचारी आणि भाजी विक्रेते अशा महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या वर्गाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पाटणचेवतीने सामाजिक बांधिलकी जोपासत नाष्टा आणि मास्क वाटप करण्यात आले.
          
        यावेळी पोलिस दल, महसुल विभाग, कृषी विभाग, भाजी विक्रेते यांना मास्क तर छ.शिवाजी महाराज गौंड तामकडे येथील कराड चिपळुन रस्त्यावरील मजुर कुटुंबीय तसेच इंदिरा नगर येथील कातकरी वसाहती मधील कुटुंबीयांना नाष्टा सोशल डिस्टन्सिंग पाळत वितरीत करण्यात आला. 
      
        महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पाटणचे पदाधिकारी अनिल माने, विकास कदम, बाबासो सुतार, चंद्रकांत सुतार, संजय डुबल, दीपक मांडावकर, विठ्ठल कळके व सैनिकी विद्यार्थी, सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.