कोरोनाच्या सावटात अतिदुर्गम भागातील लोकांच्या मदतीसाठी सरसावले वनविभाग

कोरोनाच्या सावटात अतिदुर्गम भागातील लोकांच्या मदतीसाठी सरसावले वनविभाग

              पाटण लक्ष्मीपुत्र (श्रीगणेश गायकवाड) - कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. भारत देशात गेले काही दिवस जी लॉक डाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणाला घराबाहेर पडता येत नाही.याचा परिणाम शहरातील लोकांबरोबरच ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेवरही दिसून येत आहे.अनेकांना कामही नाही, त्यामुळे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न या लोकांसमोर उभा आहे.
              सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दुर्गम वाड्या वस्त्या वरील गावांना देखील या संकटाचा सामना करावा लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या येथील गोरगरीब लोकांना उदरनिर्वाहासाठी लागणारे जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी जंगलातून पाच ते सहा किलोमीटरची  पायपीट करावी लागते. त्यातही जंगली श्वापदांची भीती. या संकटाचे गांभीर्य ओळखून सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील हेळवाक (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बावीचा वाडा व चाफेखडक या अतिदुर्गम गावातील 50 कुटुंबांना सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या प्रसंगी सर्व नागरीकानी सामाजिक अंतर ठेवले. तसेच उपस्थित लोकांना शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे आणि वनवणवा व शिकार याबाबतीत जनजागृती करण्यात आली.
             या प्रसंगी सह्याद्री व्याघ्र राखीव चे क्षेत्र संचालक तथा वन संरक्षक सत्यजीत गुजर, विभागीय वन अधिकारी चांदोली राष्ट्रीय उद्यान महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले, परिमंडळ वन अधिकारी नेताजी तांबे, वनरक्षक अक्षय चौगुले, वनरक्षक प्रकाश शिंदे, सरपंच बाळासाहेब कदम व चाफेखडक, बावीचावाडा येथील ग्रामस्थ उपस्थिती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.