चिमुकली राजकुवर देसाईची कोरोना साठी छोटीशी मदत
चिमुकली राजकुवर देसाईची कोरोना साठी छोटीशी मदत
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - सर्व जगामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाणे हाहाकार माजला आहे.सर्वजण आपापल्या परीने खारीचा वाटा म्हणून मदत करीत आहेत.अशावेळी हुपरी येथील कुमारी राजकुवर प्रतापसिंह देसाई इयत्ता तिसरी सिल्वर सिटी इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थिनीने आपल्या पिग्मींमध्ये साठविलेले १५२२/- रुपये छोटीशी मदत म्हणून हुपरी नगरपरिषद हुपरी सहाय्यता निधीकडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी कुंभार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा सौ. गाठ (काकी) यांच्याकडे सुपूर्त केली.
यावेळी नगरसेवक सुरज बेडगे, अमेय जाधव, सचिन गाठ, रफिक मुला,जयकुमार माळगे, सौ मधाळे वहिनी नगरसेविका, बाळासाहेब चोपडे व श्री प्रतापसिंह देसाई (अध्यक्ष मराठा समाज हुपरी) उपस्थित होते.
राजकुवरने सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमातून देत घरीच राहून कोरोनाला हद्दपार करण्याचा संदेश दिला आहे.या उपक्रमामुळे सर्व थरातून तिचे कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा