आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भरीव मदत

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भरीव मदत

           मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - आर्थिक अाण्णासाहेब पाटील विकास महामंडळ यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 82000/- रु. ची मदत जमा करण्यात आली.
           आर्थिक अाण्णासाहेब पाटील विकास  महामंडळ यांच्याकडून मराठा व्यवसायिक किंवा जे नवीन व्यवसाय करणार आहेत त्यांना महामंडळाकडून कर्ज दिले जाते. हे कर्ज बिनव्याजी असते. मराठा तरुणांच्या हाताला काम नाही, त्यामुळे ते मागास होत चाललेले आहेत. असे अनेक मराठा तरूण आहेत की त्यांना नोकरी मिळत नाही. आणि पैसा नसल्यामुळे व्यवसाय सुद्धा करता येत नाही. त्यांना व्यवसाय करण्यासाठी अाण्णासाहेब विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज बँकेतर्फे दिले जाते. हे कर्ज स्टेट बँक, महाराष्ट्र बँक या बँकेतर्फे दिले जाते.
              पाटण तालुक्यातील अनेक व्यवसायिक आहेत की त्यांना व्यवसाय वाढवायचा आहे. परंतु पैसा नसल्यामुळे ते व्यवसाय वाढू शकत नाहीत. त्यासाठी अनेकांनी बँकेतर्फे महामंडळाकडून कर्ज घेतलेले आहे. व त्याचा व्याजदर शून्य आहे. पाटणमधील स्टेट बँकेतून असे अनेक व नवनवीन व्यवसायिकांना सुद्धा कर्ज दिले आहे. हे कर्ज हप्त्याहप्त्याने फेडले जाते. त्यामुळे व्यवसायिक यांचा व्यवसाय सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वाढतो आहे. हे कर्ज दोन लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत दिले जाते. एका प्रकारे अाण्णासाहेब विकास महामंडळाने बिनव्याजी मराठी उद्योजकांना कर्ज देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. महामंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
            आज कोरोनामुळे  देशावरती मोठे संकट आलेले आहे. हे संकट दूर करण्यासाठी आर्थिक अाण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 82000/- रु. अशी भरीव मदत केलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.