वीर सेवा दल हुपरीच्यावतीने डॉक्टर, नर्सेस,आशा कर्मचारी यांना पाण्याचे जार व हॅन्ड ग्लोज वाटप
वीर सेवा दल हुपरीच्यावतीने डॉक्टर, नर्सेस,आशा कर्मचारी यांना पाण्याचे जार व हॅन्ड ग्लोज वाटप
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रशासन त्याबद्दल जागृत आहे.पोलीस यंत्रणा सज्ज आहे.आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, नर्सेस,आशा कर्मचारी दिवसरात्र सेवा करून कोरोनाचे रुग्ण बरे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच वेगवेगळ्या तपासण्या, चाचण्या करून जनतेचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी धडपडत आहेत.ही सर्व सेवा करीत असताना त्यांना स्वतःसाठी सुद्धा आवश्यक वैद्यकीय साहित्यांची गरज भासते.याच भावनेतून वीर सेवा दल हुपरीच्यावतीने हुपरी येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टर, नर्सेस,आशा कर्मचारी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे जार व रुग्णांना तपासताना आवश्यक असलेले हॅन्ड ग्लोज वैद्यकीय अधिकारी डॉ.तांबोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी नगरसेवक श्री सचिन गाट, वीर सेवा दलाचे प्रांतप्रमुख अजित पाटील, संघनायक अभिनंदन सौंदत्ते, उपसंघनायक सुनील गाट, बाहुबली ने गाट, दवाखान्यातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
तसेच सिल्वर झोन या भागातील 254 घरांना भेटी देऊन तेथील 1300 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वीर सेवा दलाच्या मार्फत ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशा प्राथमिक आजारांवर मोफत औषधे देण्यात आली.
यावेळी वैद्यकीय दावाखान्यातील डॉ. तांबोळे सरांनी कोरोना व्हायरस विषयी नभिता आपण कशा प्रकारे त्याचा मुकाबला करायचा यांचे मार्गदर्शन केले. डॉ.संजय हतकर व मनोज ऐनापुरे यांनी रुग्णांची तपासणीे केली.याकामी वीर सेवा दलाचे कार्यकर्ते सुनील पुरंदर गाट, महेश श्रीपन्नावर, सचिन सवळे, अविनाश मगदूम, उमेश कोथळे, स्वप्निल गाट आदींनी आरोग्य तपासणीसाठी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा