संकटकाळात किराणामाल दुकानदाराकडून पेठशिवापूर येथे ग्राहकांची लूट!

संकटकाळात किराणामाल दुकानदाराकडून पेठशिवापूर येथे ग्राहकांची लूट!

         मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडवकर) - कोरोनो  विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीत लोक जीवन जगत आहेत अशा काळात दुकानदाराकडून ग्राहकांची लूट होत आहे. जीवनावश्यक गोष्टीमध्ये किराणामाल येतो. दुकानदारांची दुकाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून चालू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र काही किराणामाल दुकानदार संकटातील संधीचा फायदा घेऊन जीवनावश्यक साहित्य जादा दराने विकत आहेत. आम्हाला जास्त दराने माल पुढे मिळत असल्याचे कारण देत ग्राहकांची लूट सुरू आहे.

          सर्वा किराणामाल दुकानदारांनी आपल्या किमतींमध्ये ग्राहकांना माल दिला गेला पाहिजे. दुकानदार असे न करता लॉकडॉनचा फायदा घेत आजच्या घडीला  अधिकची लूट दुकानदारांकडून सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उमटत आहे.

         पाटण अन्नपुरवठा अधिकारी  यांच्याकडे ल नागरिकांनी तोंडी तक्रारी होऊनसुद्धा पुरवठा अधिकारी यांनी दुकानदारांना कुठल्याही प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत.साखर, तंबाखू, कोलगेट, तेल पिशवी व  अन्य जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू जादा दराने विकत असून ग्राहकांची गळचेपी सुरू आहे. प्रशासनाने याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. व जादा दराने माल विकणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करावेत व देशावर आलेल्या संकटाचे या दुकानदारांना काहीही घेणे देणे नाही, हे केवळ आपला फायदा बघत आहेत. आज ज्यांचे पोट हातावरचे अशा नागरिकांच्या देखील हे दुकानदार विचार करत नसतील तर शासनाने देखील अशा दुकानदारावर विचार का बरे करावा? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत असून जादा दराने किराणा माल विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी मारुती देसाई, शांताराम कोळेकर, शिवाजी शेंडे, शंकर पवार, गोरख नारकर, पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार, किसन गालवे, विवेक मोहोळकर, जयवंत वरंडे, संदीप कोळेकर, दत्ता गालवे, मनेरी सरपंच व सर्वसामान्य नागरिकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.