कराड येथे दाखल असणाऱ्या 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु

कराड येथे दाखल असणाऱ्या 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु ;

प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे मृत्यु


सातारा - कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल असणाऱ्या 54 वर्षे पुरुष या कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पहाटे 5 वाजता मृत्यु झाला आहे.

हा रुग्ण मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करीत होता. तो 21 मार्च रोजी त्याच्या गावी आला.  दि.30 मार्च रोजी त्याला खोकल्याचा त्रास सुरु झाला.  5 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल करण्यात आले. 6 एप्रिल रोजी त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता व अहवालानुसार दि.7 एप्रिल रोजी हा रुग्ण कोविड-19 बाधित   पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या कोरोना बाधित 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु हा प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.