तांबवेत आशा, अंगणवाडी सेविकांचा सत्कार 

प्रांताधिकाऱ्यांच्याहस्ते सर्वेबद्दल गौरव, डॉक्टरांचाही झाला सन्मान 

               कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड तालुक्यात पहिला कोरोनाबाधीत रुग्ण तांबवे गावात सापडला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या गावात आरोग्य विभागाच्यावतीने 28 दिवस सुपने आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, आरोग्य करमचारी, पर्यवेक्षक यांनी सर्वेचे काम पुर्ण केले. त्याबद्दल तांबवे ग्रामपंचायतीच्यावतीने गुरुवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, कराड तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, तांबवेचे उपसरपंच धनंजय ताटे, माजी सरपंच आबासाहेब पाटील, निवासराव पाटील, संतोष कुंभार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, इंदुताई पाटील, आनंदराव ताटे, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष धोंडीराम पवार, सचिव सुनिल पाटील, निवासराव पवार, संदीप पाटील, दत्तात्रय भोसले, संभाजी पवार, ग्रामविकास अधिकारी टी.एल. चव्हाण, तलाठी गणपतराव धराडे, पोलिस पाटील पवन गुरव आदी उपस्थित होते. 
            प्रांताधिकारी दिघे म्हणाले, कराड तालुक्यात पहिल्यांदा तांबवे गावात कोरोनाचा रुग्ण आढळला. तालुक्यातील पहिलाच रुग्ण असल्याने आम्हालाही सर्व नवीन होते. मात्र गावकऱ्यांच्या साथीने, ग्रापंचायतीच्या सहकार्याने आणि आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या मदतीने कोरोनावर मात करता आली. लोक वेळीच तपासणीसाठी पुढे आल्याने चेन ब्रेक करता आली. या गावाने खरच चांगल काम करुन इतर गावांपुढे आदर्श ठेवला आहे. या गावातील लोक उपचार घेत होते, विलगीकरण कक्षात होते त्यावेळी त्यांची एकही तक्रार आली नाही. ही चांगली बाब आहे.
              तहसीलदार श्री. अमरदिप वाकडे म्हणाले, कोरोनासारख्या संकटातही आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी यांनी चांगले काम केले. त्यासाठी त्यांच्या कार्याला सलाम करतो. गटविकास अधिकारी पवार म्हणाले, कोरोनामुळे भितीचे वातावरण आहे. मात्र तरीही कोणीही सर्वे नको म्हणुन अर्ज न करता स्वयंस्फुर्तीने जबाबदारी म्हणुनन आशा आणि अंगणवाडी ताईंनी सर्वेचे काम पुर्ण केले. ही खुप मोठी बाब आहे. कराड तालुका पोलिस निरीक्षक धुमाळ यांनी गावातील वातावरण चांगले असुन त्यातुनच कोरोनावर मात करता आली असे सांगितले. उपसरपंच धनंजय ताटे यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच आबासाहेब पाटील यांनी आभार मानले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.