इंदिरानगर व कातकरी वस्तीत स्वच्छलयाविना नागरिकांची कुचंबणा

येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

                मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर पाटण नगरपंचायतीने शहरात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबवली असताना मात्र इंदिरानगर व कातकरी वस्तीत सार्वजनिक स्वच्छालयाचे तीनतेरा वाजले आहेत. स्वच्छालयावरील पत्रा वाऱ्याने उडून गेला आहे. काही ठिकाणी भिंतीला भेगा पडल्याने भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत. दरवाजे खिळखिळी झाली आहेत. तर स्वच्छालयासमोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने ते वापराविना पडली आहेत.
               या स्वच्छालयाच्या बिकट अवस्थेमुळे इंधिरानगर व कातकरी वस्तीतील अनेक अबालवृद्ध नागरिक शौचालयास उघड्यावर बसत असून येथील रहिवासी नागरिकांच्या अरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील बिकट अवस्थेची पाटण नगरपंचायतीने तातडीने दखल घेऊन येथील रहिवासी नागरिकांना कायमस्वरूपी स्वच्छालय वापरासाठी दुरुस्त करून द्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
               पाटण नगरपंचायतीच्या हद्दीत तहसील कार्यालयाजवळ इंदिरानगर व कातकरी वस्ती आहे. सरासरी ४०० ते ५०० लोकसंख्या असलेल्या या दोन्ही वस्तीत नागरिकांच्या सोयीसाठी पाटण नगरपंचायतीने सार्वजनिक स्वच्छालय बांधली आहेत. मात्र ही स्वच्छालय आजच्या घडीला "ना घर का.. ना घाट की.." अशी झाली आहेत. गेली कित्येक दिवस ही स्वच्छालय दुरावस्थेमुळे वापराविना खितपत पडली आहेत. स्वच्छालयावरील पत्रा वाऱ्याने उडून गेला आहे. काही ठिकाणी भिंतीला भेगा पडून ढासळण्याच्या मार्गावर आहेत. दरवाजे खिळखिळी झाली आहेत, तर स्वच्छालयासमोर घाणीचे समराज्य पसरले आहे. "ना पाण्याची सोय आहे.. ना बसण्याची व्यवस्था आहे" अशा परस्थितीत येथील अबालवृद्ध रहिवासी नागरिक नाईलाजाने उघड्यावर स्वच्छास जात आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
                या सार्वजनिक स्वच्छालयाच्या दुरुस्तीसाठी इंधिरानगर येथील रहिवाशांनी पाटण नगरपंचायतीकडे वारंवार तोंडी व लेखी मागणी केली असता स्वच्छालयाच्या दुरुस्तीसाठी पत्र्याची व्यवस्था झाली आहे. मात्र ही व्यवस्था तातपुरत्या स्वरूपाची नको असून कायमस्वरुपाची व्हावी अशी मागणी होत आहे. कारण पुढील एक-दीड महिन्यात पावसाळा सुरु होत आहे. अशा परस्थितीत रहिवासी नागरिकांची स्वच्छाची गैरसोय होणार म्हणजे आणखी भयंकर आजारांना निमंत्रण देणे ठरु नये. ऐवढीच अपेक्षा रहिवासी नागरिकांनी व्यक्त करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.