राजस्थानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याना आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न
नगरसेवक अमजद नदाफ यांना मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती : पोलिस महासंचालकाना माहिती घेण्याचे आदेश
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - राजस्थान राज्यातील कोटा व बीकानेर येथे महाराष्ट्रातील दोन हजार विद्यार्थी अडकले असुन त्यात कोल्हापूर जिल्यातील विद्यार्थ्यांचा ही समावेश आहे, याबाबतचे निवेदन नगरसेवक अमजद नदाफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले असुन मुख्यमंत्र्यानी राज्याचे पोलिस महासंचालक यांना याबाबत मेल करुन माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. तसा मेल नदाफ यांना प्राप्त झालेला आहे.
राजस्थान कोटा, येथेही ११वी १२वी च्या विविध परीक्षा ची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी गेलेले आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.कोटा येथे राज्यातील विद्यार्थ विविध कोचिंग क्लासेस करिता दोन वर्षे होस्टेल, रूम, फ्लॅट घेऊन राहतात.हे सर्व विद्यार्थी १६ ते १७ वर्षीय वयोगटातील असल्याने व त्यात अनेक विद्यार्थीनिही असल्याने पालक चिंताग्रस्त तणाखाली आहे.
मध्यप्रदेश सरकारने आपल्या हद्दीतील सर्व सीमांवर चोख बंदोबस्त ठेऊन बंद केली आहे.महाराष्ट्र राज्यातील पालक या विद्यार्थ्यांना आपल्या खाजगी वाहनाने घेऊन येण्यासाठी गेल्यास त्यांना मध्यप्रदेशच्या सीमांवरुन परत पाठवले जात आहे.उत्तरप्रदेश सरकारने कोटा येथील २५० पेक्षा अधिक शासकीय बस सेवा पाठवून विध्यार्थी कोटा येथून घेवून जाणास सुरुवात केली आहे.याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील प्रत्येक जिल्ह्यातील एसटी महामंडळच्या बसेस किंवा इतर खासगी वाहनांची व्यवस्था करून महाराष्ट्र राज्यातील शिक्षणासाठी कोटा राजस्थान यासह देशात/राज्यात विविध ठिकाणी शिक्षणासाठी बाहेरगावी अडकुन असलेला विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच बीकानेर येथे चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थी अडकले असुन ते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आहेत. यां विद्यार्थ्याना तातडीने आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नगरसेवक अमजद नदाफ यांनी केली होती. आज मुख्यमंत्री सचिवालयाने याबाबत राज्याच्या पोलिस महासंचालकाना पत्र पाठवून याबाबत माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.
अमजद नदाफ यांच्या प्रयत्नांना जाहीर आभार,संवेदनशील पत्रकार
उत्तर द्याहटवाthanksto publish news
उत्तर द्याहटवाAlso thanks to laxmiputra.blogspot
हटवा