पाटणला दोन रेशन धान्य दुकानदारांवर कारवाई

धान्य दुकानदारांकडून शासनाचे नियमांची पायमल्ली

             मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडावकर) - पाटण तालुक्यातील रेशन धान्य दुकानांमध्ये धान्य वाटपामध्ये अनियमितता आढळून आल्याने दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पाटण पुरवठा विभागाचे निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांनी दिली.

             कोरोनाच्या संकटात कोणी उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिधापत्रिका धारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हे करीत असताना धान्य दुकानदारांकडून शासनाचे नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यानुषंगाने पाटण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी करण्यात येत आहे.

             तसेच यावेळी पाटण तालुक्यातील दुकानदार संतोष रामचंद्र खाडे (रा. निगडे) व यशवंत धोंडीबा डिगे (रा.डिगेवाडी) यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची यादी आद्यवत नाही, नोंदवही ठेवलेली नाही, शिधापत्रिका ऑनलाइन केले नाहीत व कोणत्याही फलक दुकानात लावला नसल्याचे तपासणीत आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी कळवले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.