कृष्णा अभिमत विद्यापीठाचा 21 मे रोजी व्हर्च्युअल पद्धतीने दीक्षांत सोहळा

कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने 21 मे रोजी व्हर्च्युअल पद्धतीने वार्षिक दीक्षांत सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हर्च्युअल दीक्षांत सोहळ्यात 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक 15 मे रोजी व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार संबंधित अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा झाल्यानंतर 180 दिवसांच्या आत दीक्षांत सोहळा आयोजित करून, विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणे आवश्यक असते. पण कोराना काळात जाहीर पद्धतीने दीक्षांत सोहळा आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनानुसार व्यवस्थापन मंडळाने 21 मे रोजी व्हर्च्युअल पद्धतीने दीक्षांत सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, यादिवशी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल पद्धतीने पदवी प्रदान केली जाईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
दरम्यान, सद्यस्थिती पूर्ववत झाल्यानंतर काही काळाने नियमित विस्तारित दीक्षांत सोहळा आयोजित करून, या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमंत्रित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या भविष्यात आयोजित करण्यात येणाऱ्या नियमित विस्तारित दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या पदवी प्रदान आणि पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार, पदक आणि पारितोषिकेदेखील प्रदान केली जाणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा