पाटण पत्रकार संघाला माणदेशी फाउंडेशनची मदत

मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - देशावर पसरलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटात पत्रकार देखील जीवावर उदार होऊन सर्वसामान्यांपर्यंत कोरोनाच्या बातम्या पाठवण्यासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्तव्यात ग्रामीण भागातील पत्रकार देखील मागे नाहीत. हे कर्तव्य बजावत असताना सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहण्याचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवत आहे. समाजासाठी झटणाऱ्या या पत्रकारांकडे समाजाचेच दुर्लक्ष होत असताना मराठी पत्रकार परिषदेचे संलग्न असणाऱ्या सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या मदतीने माणदेशी फाउंडेशनची पाटण तालुका पत्रकार संघाला जीवनावश्यक वस्तूंची मदत देऊन संकटसमयी पत्रकारांना मदत केली. पाटण तालुका पत्रकार संघाने ही मदत स्वीकारून सातारा जिल्हा पत्रकार संघ व माणदेशी फाउंडेशन विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
सातारा जिल्हा पत्रकार संघामार्फत सध्या जिल्ह्यातील पत्रकारांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे वाटप सुरू आहे. माणदेशी फाउंडेशन समूहाने जिल्हा पत्रकार संघाच्या हाकेला साद देऊन जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य सातारा जिल्हा पत्रकार संघाकडे सुपूर्द केले. हे साहित्य जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे कार्याध्यक्ष शरद काटकर सरचिटणीस दीपक प्रभावळकर यांनी जिल्हा पत्रकार इलेक्ट्रॉनिक सोशल मिडीयाचे जिल्हा निमंत्रक संतोष शिंदे. समन्वयक प्रशांत जगताप, प्रतीक भद्रे यांच्यामार्फत पाटण पत्रकार संघाकडे पोहोच केले.
यावेळी अध्यक्ष विलासराव माने उपाध्यक्ष योगेश हिरवे, पी. के. कांबळे, शंकर मोहिते, विक्रांत कांबळे विद्या मासुर्णेकर, नितीन खैरमोडे, सुरेश संकपाळ, प्रवीण जाधव, दिनकर वाईकर, सचिन पोतदार, संदीप भोळे, के. डी. चव्हाण, सुधीर लोहार, यांची उपस्थिती होती. राजेंद्र मेळवने यांचे विशेष सहकार्य मिळाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा