कोरोना वॉरियर्स पुरस्काराने पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के सन्मानित

कोरोना वॉरियर्स पुरस्काराने पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के सन्मानित


          हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात हाहाकार उडिवला आहे. भारत लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना विषाणूची चेन खंडित करण्यासाठी नागरिकांनी बाहेर न पडता घरीच बसायचे आणि या शत्रूला नेस्तनाबूत करायचे, गेली दोन महीने हुपरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि त्यांच्या टीम ची धावपळ पहाटे 4 पासून चोवीस तास ही मंडळी कार्यरत आहेत. आपल्या देशबंधूंना कोरोणाची लागण होऊ नये यासाठी धड्पड्ताहेत, त्यासाठी त्यांना आविष्कार फौंडेशन ने कोरोना वॉरियर्स पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
          गेली अनेक दिवस पोलीस निरीक्षक मस्के हें रात्रीचा दिवस करुन जनतेचे कोरोना पासून रक्षणच करीत आहेत. लोकाना किराणा माल, पाणीपुरवठा आणि औषध आदी जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठीही मस्के राबत आहेत. लोकांना दिलासा द्यायचा, त्यांना गर्दीपासून परावृत्त करायचे यासाठी ते झटत आहेत. मी पाहिले की हुपरी परिसरातील लॉकडाऊन इतर शहरांपेक्षा कितीतरी सरस आहे. आपले घरदार विसरून हें पोलिस कर्मचारी लोकांच्या आरोग्यासाठी झटत आहेत. 2019 च्या प्रलयकारी महापूरावेळीही त्यांनी केलेले कामं अतुलनीय असेच होते. कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे त्यांचे काम त्यापुढे जाऊन खाकीतील वर्दीत दडलेल्या माणुसकीचे दर्शना त्यांच्या कार्यतूण दिसत आहे. याची दखल घेऊन आविष्कार फौंडेशन महाराष्ट्र चे अध्यक्ष संजय पवार यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
         या पुरस्काराबद्दल पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या विविध स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.