आण्णासो शेंडूरे यांच्याकडून 4000 कुटुंबास तांदूळ बॅग स्वतः घरोघरी जाऊन वाटप

आण्णासो शेंडूरे यांच्याकडून 4000 कुटुंबास तांदूळ बॅग स्वतः घरोघरी जाऊन वाटप 

                  हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे हुपरी नगरपरिषद व हुपरी जिल्हा परिषद मतदार संघातील तळंदगे, इंगळी या परिसरातील, पंचतारांकित औद्योगिक वसाहती मधील व हुपरी परिसरातील उ. प्रदेश, बिहार, झारखंड, प. बंगाल येथील सर्व चांदी कारागिरांवर लॉकडाऊनमुळे फार मोठे आर्थिक संकट उद्दभवले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आण्णासो बळवंत शेंडूरे यांनी हुपरी गावामध्ये 20 टन (20 हजार किलो) चांगल्या प्रतीचे तांदूळ सर्व गोरगरीब, चांदी कारागीर, बांधकाम मजूर, शेतमजूर असे 4000 कुटुंबास (प्रति कुटुंबास 5 किलो तांदूळ बॅग) स्वतः घरोघरी जाऊन प्रत्यक्ष वाटप केले.
                तसेच हुपरी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्मिताताई विरकुमार शेंडूरे यांनीही स्वतः इंगळीमध्ये 1.5 टन (1500 किलो) व तळंदगेमध्ये 1.5 टन (1500किलो) चांगल्या प्रतीचे तांदूळ बॅग प्रति कुटुंबास 5 किलो प्रमाणे वाटप केले. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.