टेम्परेचर डिटेक्टिव्ह ने टेम्परेचर तपासणी, सॅनिटायजर व जंतुनाशक फवारणी सुरु
मोरगिरी, पेठ्शिवापूर व गोकुळ तर्फ पाटण ग्रामपंचायत प्रशासनाची लगबग
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - कोरोना संसर्गाचा फैलाव मोरगिरी भागात वाढला आहे. मोरगिरी भागातही कोरोना बाधित रुग्ण सापडले असल्याने खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील मोरगिरी भागातील गावात ग्रामपंचायती मार्फत घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका, मदतीनीस, आशा सेविका यांच्या साह्याने सॅनिटायजरचे वाटप करून कोरोना पासून बचाव करण्यासाठी करावयाचे उपाय कोणकोणते आहेत ते सांगितले जात आहे. त्याच बरोबर भागात रुग्ण सापडले असल्यामुळे कोणीही कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. गर्धीच्या ठिकाणी जाणे टाळावे. बाहेर पडल्यास तोंडाला रुमाल किवा मास्क लावावेत. दर अर्ध्या तासाला आपले हात स्वच्छ साबणाने धुवावेत व नंतर हाताला सॅनिटायजर लावून ‘ घरी रहा सुरक्षित रहा ‘ असे संदेश येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील मोरगिरी भागातील गावात आपत्ती व्यवस्थान समिती, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग सह ग्रामस्थांच्या मदतीने भागातील गावामधील सार्वजनिक ठिकाणे, शाळा निर्जंतुकीकरण करण्यासाठी तसेच कोरोनावर काही प्रमाणात मात करण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रॅक्टरपंपाच्या साह्याने भागातील मोरगिरी, पेठ्शिवापूर व गोकुळ तर्फ पाटण या गावात जाऊन सोडियम हायड्रोक्लॉराइड ची फवारणी सुरु केली.
यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री. एस. एन. भोसले व श्री डी. यु. कोकणी, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, युवावर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्वजण आपल्या जीवाची परवा न करता उपस्थित होते. व आपले गाव कोरोना काळात कोरोनामुक्त कसे ठेवता येईल याची दक्षता घेताना दिसत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या आर्थिक निधीतून अशा प्रकारच्या टेम्परेचर डिटेक्टिव्ह आणि सिपीओ टू या मशीन च्या खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे भागातील ग्रामपंचायत प्रशासनाने टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्सची खरेदी केली आहे. गावातील सर्व नागरिकांची टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्सने तपासणी करण्याचे काम वेगाने चालू आहे. टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्स मुळे ग्रामिण भागांत टेम्परेचर तपासणी वस्तुनिष्ठ होऊ लागली असल्याने आरोग्य सेवकांशी आतापर्यंत खोटे बोलणारांचे आता पितळ उघडे पडू लागले आहे. दरम्यान पाटण तालुक्यात सध्या ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अशा मशिन्स गावोगावी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविका ज्यावेळी प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्याची माहिती घेतात तेव्हा बऱ्याच वेळा ताप असताना ही आरोग्य कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिली जाते. मात्र त्याचवेळी खाजगी दवाखान्यातून संबंधित रुग्णाची नोंद होते. त्यामुळे शासनाला रुग्णासंबंधी वस्तुस्थिती समोर येत नाही. परिणामी कोरोनाच्या संदर्भातील लक्षणांची योग्य चाचणी होत नाही. मात्र आता ग्रामपंचायतीने ही मशीन खरेदी केल्याने चिंता मिटलेली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा