एक लाख रुपयांचा धनादेश सहकार व पणनमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त
श्री शिवाजी माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्था मर्या.कराड यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात
कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोनाचे संकट काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत.सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्री शिवाजी माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्था मर्या.कराड यांच्यावतीने शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष जयंत पाटील (काका), खजिनदार संजय बदीयानी, श्री शिवाजी माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्था मर्या कराड चे चेअरमन मोहन कदम, सेक्रेटरी भास्कर थोरात यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 साठी १,०००००/- रुपयेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.
लॉकडाउनमुळे अनेक संस्था, लहान- मोठे उद्योगधंदे बंद आहेत.तसेच जनतेस जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेही गरजेचे झाले आहे.त्यामुळे मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत श्री शिवाजी माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्था मर्या.कराड यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी १,०००००/- रुपयांचा धनादेश नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे आज सुपूर्द केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा