नगरसेवक मोहसीन आंबेकरी व अख्तर आंबेकरी मित्र परिवाराच्यावतीने अन्नधान्य किटचे वाटप
600 किटचे वाटप व सर्वत्र कौतुक
कराड (लक्ष्मीपुत्र) - सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह महाराष्ट्र लॉकडाऊन आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर कराड तालुक्यातमध्येही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी कराड शहर व तालुक्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी, प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे अाहे.अशा परिस्थितीमध्ये सध्या संपूर्ण देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने नगरसेवक मोहसीन आंबेकरी व सामाजिक कार्यामध्ये प्राधान्याने अग्रेसर असणारे अख्तर आंबेकरी मित्र परिवारातर्फे गोरगरीब व गरजू कुटुंबांना 600 अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
नगरसेवक मोहसीन आंबेकरी व सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी मित्र परिवाराच्यावतीने गोरगरीब, गरजू कुटुंबांना 600 अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. या अन्नधान्याच्या किड्समध्ये तांदुळ, गहु, ज्वारी, तेल, तुरडाळ, मसूर डाळ, साखर, चहा पावडर, चटनी अशा गरजू वस्तूंचे किट्स बनवुन वाटप केले आहे. व तरीही काही गरजू कुटुंबांना हवे असल्यास त्यांनी कृपया या नंबरवर मुसद्दिक आंबेकरी 9922098383 संपर्क करावा असे आव्हानही अख्तर आंबेकरी मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
अख्तर आंबेकरी म्हणाले, कुणीही घाबरू नका, धीर धरा, कुठल्याही प्रकारचे संकट ज्यावेळेस राज्यावर आणि देशावर येते त्यावेळेस सर्व जनतेने एकजुटीने त्या संकटाचा सामना केला पाहिजे. ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे. या स्थितीला कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. आपले कर्तव्य निष्ठेने व जागरूक राहुन कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचे योगदान असले पाहिजे.मात्र कोरोनाच्या लढाईमध्ये डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार, वीज पुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या सार्वजनिक व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद देत अख्तरभाईंनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा